फोर्ब्जच्या यादीत मर्केल पहिल्या स्थानावर; 'या' भारतीय महिलेचा पहिल्यांदाच समावेश

वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

  • फोर्ब्ज'च्या यादीत 34 व्या स्थानावर
  • मर्केल पहिल्या स्थानावर कायम

न्यूयॉर्क : फोर्ब्ज संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वांत प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला. त्या या यादीत 34 व्या स्थानावर आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल या सलग नवव्या वर्षी यादीत पहिल्या स्थानावर आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या वर्षी जगभरातील अनेक महिलांनी सरकार, उद्योग, समाजकार्य, प्रसार माध्यमे या क्षेत्रांमध्ये अत्यंत निर्णायक आणि आघाडीची भूमिका बजावली. फोर्ब्जने 2019 मधील अशा प्रभावशाली महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. अँजेला मर्केल यांच्यानंतर या यादीत युरोपीय सेंट्रल बॅंकेच्या अध्यक्षा ख्रिस्तीन लगार्ड यांचा क्रमांक लागतो. अमेरिकेतील लोकप्रतिनिधी नॅन्सी पेलोसी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सीतारामन (वय 60) यांचा या यादीत प्रथमच समावेश झाला आहे. भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या सीतारामन यांनी देशाचे संरक्षणमंत्रिपदही भूषविले आहे. सीतारामन यांच्याव्यतिरिक्त एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोशनी नाडर मलहोत्रा आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ यांचा समावेश आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचाही यादीत समावेश असून, त्या 29 व्या क्रमांकावर आहेत.

CAB : जपानी पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याला ब्रेक; आंदोलनाचा फटका 

रोशनी मलहोत्रा (वय 37) या 54 व्या क्रमांकावर आहेत. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने त्या जवळपास 9 अब्ज डॉलरचे व्यवहार पाहतात. त्या शिव नाडर फाउंडेशनच्या विश्‍वस्त असून याद्वारे भारतात शैक्षणिक कार्य केले जाते. यादीत 65 व्या क्रमांकावर असलेल्या किरण मुझुमदार-शॉ (वय 66) या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nirmala Sitharaman among forbes world 100 most powerful women list