Nirmala Sitharaman: अमेरिकेच्या वृत्तपत्रात अर्थमंत्री सीतारामण यांना म्हटलं वाँटेड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nirmala Sitharaman Called Wanted In Us Newspaper Wall Stree Journal

Nirmala Sitharaman: अमेरिकेच्या वृत्तपत्रात अर्थमंत्री सीतारामण यांना म्हटलं वाँटेड

अमेरिकेतील वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मोदी सरकारच्या विरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले. या जाहिरातीमध्ये भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासह १४ वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना परदेशी गुंतवणूकदारांचा विरोधक असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच ते वाँटेड असल्याचंही म्हटलं आहे.(Nirmala Sitharaman Called Wanted In Us Newspaper Wall Stree Journal )

निर्मला सीतारामण या सध्या जी२०च्या अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरच्या बैठकीमध्ये अमेरिकेत सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, अमेरिकन वृत्तपत्रातील या जाहिरातीची जोरदार चर्चा रंगली आहे.

या जाहिरातीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जज हेमंत गुप्ता, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, एंट्रिक्स कॉर्प के चेयरमैन राकेश शशिभूषण, वी रामसुब्रमण्यम, स्पेशल पीसी (भ्रष्टाचार निवारण) अॅक्ट जज चंद्रशेखर, सीबीआई डीएसपी आशीष पारीक, ईडीचे संजय कुमार मिश्रा आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एन वेंकटरमन यासर्वांच्या नावांचा समावेश आहे. ही जाहिरात १३ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली.

संबंधित व्यक्तींनी सरकारी संस्थांचा गैरवापर करून भारताला गुंतवणुकदारांसाठी असुरक्षित केलं आहे. अशा आरोप जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे. तसेच, जाहिरातीत एका कोपऱ्यात क्यूआर कोडसुद्धा देण्यात आला आहे. तो स्कॅन केल्यानंतर अमेरिकन थिंक टँक फ्रंटियर्स ऑफ फ्रीडमची वेबसाइट ओपन होते.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार कंचन गुप्ता यांनी दावा केला की ही मोहिम देवास मल्टीमीडियाचे माजी सीईओ रामचंद्रन विश्वनाथन चालवत आहेत. धोका देणाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना शस्त्र बनवणं लाजीरवाणं आहे. हे खूपच धक्कादायक असून भारत आणि सरकारला टार्गेट करण्यासाठी छापण्यात आलं आहे.

टॅग्स :americanirmala sitharaman