मोदी सरकारची माघार; नजरचुकीने अल्पबचत व्याजदर कपातीचा निर्णय

modi govt
modi govt

नवी दिल्ली : काल 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2020-2021 ची समाप्ती झाली. या आर्थिक वर्षाच्या अखेरिस मोदी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला होता. मोदी सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र, आता मोदी सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. 2020-21 मधील व्याजदर 'जैसे थे' राहणार आहेत. हा निर्णय नजरचुकीने निघाला असल्याचं म्हणत निर्णय मागे घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. अवघ्या 24 तासांत हा निर्णय मोदी सरकारकडून मागे घेण्यात आला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने केलेली ही कपात धक्कादायक मानली जात होती. मध्यमवर्गीयांच्या आयुष्यावर हा निर्णय दुरगामी परिणाम साधणारा मानला जात होता. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर मोदी सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. अवघ्या 24 तासांत मोदी सरकारने आता हा निर्णय फिरवला आहे.

Interest rates of small savings schemes of GoI shall continue to be at the rates which existed in the last quarter of 2020-2021, ie, rates that prevailed as of March 2021.
Orders issued by oversight shall be withdrawn. @FinMinIndia @PIB_India

— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 1, 2021

सरकारने छोट्या बचतींच्या व्याजदरांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करुन सर्वसामान्य लोकांना मोठा झटका दिला होता. बचत खाते, पीपीएफ, टर्म डिपॉसिट, आरडी ते वयस्कर लोकांसाठीच्या असलेल्या बचत योजनांवरील व्याजदरांमध्ये सरकारने भरभक्कम अशी कपात केली होती. ही कपात नवे आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये लागू करण्यात आली होती. आज 1 एप्रिलपासून लागू झालेले हे नवे व्याजदर 30 जून 2021 पर्यंत अंमलात येणार होते.

Govt cuts interest rates on small savings wef from April 1

Savings deposit revised from 4% to 3.5%,annually.
PPF rate down from 7.1% to 6.4%,annually.
1 yr time deposit revised from 5.5% to 4.4%,quarterly.
Senior citizen savings schemes rate down from 7.4% to 6.5%,quarterly&paid pic.twitter.com/x05Hko3vho

— ANI (@ANI) March 31, 2021

अशी झाली होती कपात

बचत खात्यामधील जमा रकमेवर वार्षिक व्याज 4 टक्क्यांवरुन कमी करुन 3.5 टक्के करण्यात आला होता. पब्लिक प्रॉव्हींडट फंड (PPF) वर आतापर्यंत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळत होते, ते कमी करुन आता 6.4 टक्के करण्यात आले होते. एका वर्षाच्या जमा रकमेवरील तिमाही व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 4.4 टक्क्यांवर आणला गेला होता. वयस्कर लोकांच्या बचत योजनांवर आता 7.4 टक्क्यांऐवजी केवळ 6.5 टक्के इतकेच तिमाही व्याज मिळणार होते.  एका वर्षासाठीच्या टर्म डिपॉझिटवर 5.5 टक्क्यांऐवजी 4.4 टक्के व्याज तर 2 वर्षांसाठीच्या बचतीवर 5.5 टक्क्यांऐवजी 5 टक्के, 3 वर्षांसाठीच्या बचतीवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.1 टक्के, 5 वर्षांसाठीच्या बचतीवर 6.7 टक्क्यांवरुन 5.8 टक्के व्याजदर मिळणार होते. तर 5 वर्षांच्या आरडीवर 5.8 टक्क्यांवरुन 5.3 टक्के व्याजदर मिळणार होता. मासिक पगार खात्यावर आता 6.6 टक्क्यांऐवजी फक्त 5.7 टक्केच व्याजदर मिळणार होता. 

नॅशनल सेव्हींग्स सर्टिफिकेटवर 6.8 टक्क्यांऐवजी केवळ 5.9 टक्के व्याजदर दिला जाणार होता. किसान विकास पत्रावर 6.9 टक्क्यांऐवजी 6.4 टक्के व्याज तर मॅच्यूअर होण्याचा अवधी 124 महिन्यांवरुन वाढवून 138 महिने केला होता. याशिवाय सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदराला 7.6 टक्क्यांवरुन 6.9 टक्क्यांवर आणण्यात आलं होतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com