

Finance Minister Nirmala Sitharaman
नवी दिल्ली: ‘‘विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीची (एफडीआय) मर्यादा ४७ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत नेण्याची मुभा देण्याच्या दृष्टीने संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात विमा सुधारणा विधेयक सादर केले जाण्याची शक्यता आहे,’’ असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी सांगितले. सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याचे स्पष्ट केले होते.