
नवी दिल्ली : पहिल्या घटनादुरुस्तीपासून काँग्रेसने सोयीनुसार राज्यघटनेचा वापर केल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत केला. राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सोपविण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आजपासून राज्यसभेत राज्यघटनेच्या वैभवशाली ७५ वर्षांच्या प्रवासावर चर्चा सुरू झाली. चर्चेची सुरूवात केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.