esakal | ‘केंद्र सरकार खरे आकडे लपवतेय’; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर

बोलून बातमी शोधा

narendra modi
‘केंद्र सरकार खरे आकडे लपवतेय’; अर्थमंत्र्यांच्या पतीकडूनच 'घरचा' आहेर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोना महामारीचा दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. दररोज साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. तर जवळपास तीन हजार जणांचा दररोज मृत्यू होतोय. रुग्णालयातील परिस्थिती चिंताजनक होत असून ऑक्सिजन अभावी अनेकांनी प्राण सोडले आहेत. कोरोनामुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला लक्ष्य केले जात आहे. देशातील विदारक परिस्थितीवर भाष्य करताना निर्मला सितारामण यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे.

एका अर्थविषयक ऑनलाईन चर्चेदरम्यान अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका करत आपलं मत व्यक्त केले. भारतात दररोज कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. देशात सध्या आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्यां परकला प्रभाकर म्हणाले.

पुढे बोलताना अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर म्हणाले की, 'कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात अतिशय विदरक परस्थिती निर्णाम झाली आहे. या भयावह संकटामुळे लोकांना नोकऱ्या गमावाव्या लागत आहेत. कोरोनावरील उपचारासाठी रुग्णालयात जवळ असणारे पैसे खर्च केल्यामुळे साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर पुन्हा उभे राहणं कठीण जात आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेलाय. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तवात परिस्थिती यापेक्षा भयानक आहे.'