Jharkhand News : निशा भगत यांच्या मृत्यूची राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून दखल; झारखंड सरकारला सात दिवसांची मुदत, कुटुंबीयांची सीबीआय चौकशीची मागणी
Nisha Bhagat Death Case: आदिवासी कार्यकर्त्या निशा कुमारी भगत यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. झारखंड सरकारला सात दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
रांची : आदिवासी कार्यकर्त्या निशा कुमारी भगत यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने (एनसीएसटी) मंगळवारी स्वतःहून दखल घेत झारखंड सरकारला सात दिवसांत सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.