निता अंबानी पितात 3 लाखाचा चहा! जाणून घ्या त्यांचे 8 महागडे छंद

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 18 November 2020

निता अंबानींचे 8 छंद खूप महागडे असून सर्वसामान्य लोक त्याची कल्पनाही करु शकत नाही. 

निता अंबानी या जगात सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या पत्नी आहेत. निता या नेहमीच हेडलाईनमध्ये असतात. त्या मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्या तरी आता त्या एका श्रीमंत कुटुंबाच्या सून आहेत. त्यांच्या आवडीही यूनिक आहेत. इंटरनेटवरील रिपोर्टनुसार निता अंबानींचे 8 छंद खूप महागडे असून सर्वसामान्य लोक त्याची कल्पनाही करु शकत नाही. 

निता अंबानींचे आठ छंद-

तीन लाख रुपयांचा चहा

निता अंबानी यांनी स्वत:च एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्या जपानच्या सर्वात जुन्या क्रॉकरी ब्रँड असलेल्या नोरिटेकमध्ये चहा पितात आणि या एका कपाची किंमत 3 लाख रुपये आहे. 

डायमंड लावलेले बॅग

निता आपल्या स्टाईलनुसार वेगवेगळ्या बॅग वापरतात. या बॅगेवर डायमंड लावलेले असतात. निता यांच्याकडे जगातील सर्वात महागड्या ब्रँडचे बॅग आहेत. या बॅगांवर लावण्यात आलेल्या डायमंडची किंमत 4 लाखांच्या पुढे असते. 

एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाही

निता अंबानी यांना महागड्या शूज आणि सँडलची खूप आवड आहे. त्यांच्याकडे पेट्रो, गार्सिया, जिमी चू, पेल्मोरा, मर्लिन यासारख्या ब्रँडचे शूज आहेत. यांची किंमत 1 लाखांपासून सुरु होते. असं म्हटलं जातं की निता एकदा वापरलेले शूज पुन्हा वापरत नाहीत. 

साडेचार हजारांहून अधिक दुचाकीची विक्री ; पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी 

घड्याळ्यांचे कलेक्शन

निता यांना घड्याळ्यांचीही आवड आहे. त्यांच्याकडे बुलगरी, कार्टियर, रॅडो, गुच्ची, केल्विन केलिन आणि फोसिल सारख्या ब्रँडची घड्याळे आहेत. या घड्याळ्यांची किंमत 1 ते 2 लाखांपासून सुरु होते. 

निता अंबानी अनेक कार्यक्रमांमध्ये दागिने घातल्याचं पाहिलं असेल. निता अंबानी यांच्या दागिन्यांची किंमत एक कोटीपासून सुरु होते. 

साडी

निता अंबानी यांच्या साडीवर डायमंड आणि सोन्याचे काम केलेले असते. रिपोर्टनुसार, निता यांनी त्यांच्या मुलाच्या इंगेजमेंट दिवशी 40 लाखांची साडी घातली होती. 

लिपिस्टिक कलेक्शन

निता अंबानींचे लिपिस्टिक अत्यंत महागडे असतात. त्यांच्या कलेक्शनमध्ये 40 लाखांपेक्षा अधिक किंमतीचे लिपिस्टिक ब्रँड आहेत. 

वैयक्तिक खासगी जेट

मुकेश अंबानी यांनी 2007 मध्ये आपल्या पत्नीला 100 करोड रुपयांचे जेट भेट दिले होते. यामध्ये फाईव्ह स्टार सारख्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nita Ambani drinks 3 lakh rupees tea has 8 expensive hobbies

Tags
टॉपिकस
Topic Tags: