Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ; प्रकृती बिघली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांना पुन्हा भोवळ; प्रकृती बिघली

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी एका कार्यक्रमादरम्यान मंचावर अचानक प्रकृती बिघडली. नितीन गडकरी पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमात बोलत होते. अचानक त्यांना भोवळ आली. यापूर्वीही त्यांच्यासोबत अशी घटना घडली आहे. (Nitin Gadkari falls SICK on stage in Siliguri )

नितीन गडकरी हे सिलीगुडीतील शिवमंदिर ते सेवक छावणीपर्यंतच्या रस्त्याच्या पायाभरणीसाठी आले होते. दार्जिलिंग जंक्शनजवळील डागापूर मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांना अचानक भोवळ आली. प्रकृती बिघडली असता ताक्ताळ कार्यक्रम थांबवण्यात आला.

अचानक साखरेची पातळी घसरल्याने त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि केंद्रीय मंत्र्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अधिकाऱ्यांना गडकरी यांची दखल घेण्याची सूचना दिली आहे. त्यानंतर नितीन गडकरींना कार्यक्रमाच्या बाहेर नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गडकरी राजू बिश्त यांच्या बरसाना येथील निवासस्थानी जाऊन विश्रांती घेणार आहेत.

टॅग्स :Nitin Gadkari