आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींनी केलं सुतोवाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींनी केलं सुतोवाच

आता लहान कारमध्ये देखील एअरबॅग्स; नितीन गडकरींनी केलं सुतोवाच

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सगळ्याच मॉडेलच्या कारमध्ये एअर बॅग लावण्याचं वक्तव्य पुन्हा एकदा केलं आहे. रविवारी त्यांनी एका इंटरव्ह्यू दरम्यान म्हटलंय की, छोट्या कार या अधिकतर निम्न मध्यम वर्गाच्या लोकांकडून खरेदी केल्या जातात. त्या कारमध्ये योग्य त्या आवश्यक संख्येमध्ये एअरबॅग्स असायला हवेत. मी हैराण आहे यासाठी की ऑटोमोबाईल कंपन्या या केवळ श्रीमंत लोकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मोठमोठ्या आणि महाग कारमध्येच 8 एअरबॅग्स देतात. मी कार कंपन्यांना सगळ्या प्रकारच्या मॉडेलवर कमीतकमी 6 एअरबॅग्स देण्याची अपील करतो.

हेही वाचा: मुश्रीफ, अजित पवारांचे कारखान्यातील 'घोटाळे' बाहेर काढणार : सोमय्या

नितीन गडकरी यांनी या आवाहनानंतर पुन्हा एकदा मोठी चर्चा छेडली गेली आहे. आता मर्सिडीज्, BMW, ऑडी सारख्या कारप्रमाणेच Alto, Kwid, Santro सारख्या कारमध्ये देखील 6 अथवा त्याहून अधिक एअरबॅग्स असतील का? जर तसं झालं तर सामान्य ग्राहकावर त्याचा किती अधिक भार पडेल? की कंपन्या कसलीही रक्कम न वाढवता या सुविधा प्राप्त करवून देतील? हे सारे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. मात्र, या अतिरिक्त सुविधेचा भार ग्राहकांवरच पडण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा: पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला, 8 जणांचा मृत्यू

किती वाढेल किंमत?

इंडस्ट्रीमधील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 6 एअरबॅग्स या अनिवार्य असतील. वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आधारावर प्रति बॅग्स 4000-12000 रुपये अधिक लागण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा आहे की, कारच्या किंमतींमध्ये 16000 रुपये ते 48000 रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते. वास्तविकत: नव्या नियमांनुसार, एप्रिल 2021 पासून सर्व नव्या कार मॉडेल्समध्ये पुढे दोन्ही सीट्ससाठी एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. तर 31 ऑगस्ट 2021 पासून कार मॉडेल्सच्या पुढच्या दोन्ही सीट्ससाठी एअरबॅग्स अनिवार्य आहेत. त्यामुळे कार कंपन्यांना 6 एअरबॅग्ससाठी 4 एअरबॅग्स अतिरिक्त लावाव्या लागणार आहेत.

Web Title: Nitin Gadkari Says Car Price May Go Up If Car Companies Add Six Airbags In All Type Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkari
go to top