'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत' : नितीन गडकरी | Electric Vehicle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Gadkari On Electric Vehicle

'दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहने पेट्रोल-डिझेल गाड्यांच्या किमतीत'

देशात वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची (EV) संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, प्रदुषण (Pollution) कमी करण्यासाठी सरकारकडून देखील इलेक्ट्रिक वाहने (Electric Vheicle) खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले जात आहे, या दरम्यान इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी दिलासादायक माहिती दिली .

इलेक्ट्रिक वाहने चालवण्याचा खर्च कमी असला तरी ही वाहने पेट्रोल डिझेल वर चालणाऱ्या वाहनांपेक्षा बरीच महाग असतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ते विकत घेणे परवडत नाही, दरम्यान याबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षात इलेक्ट्रिक कार (Electric Car) आणि बाईक (Electric Bike) ची किमत ही पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांच्या किमती एवढी होईल, तसेच येत्या काळात आम्ही सर्वसामान्य लोकांना पर्यायी इंधन वापरण्याचा पर्याय देत आहोत, असे देखील त्यांनी सांगीतले.

हेही वाचा: इलेक्ट्रिक वाहन खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या इन्शुरन्सचे नियम

पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, येत्या काळात नवीन गाडयांची किंमत ही 35 टक्क्यांनी कमी होईल. एवढेच नाही तर जुन्या गाडया भंगारात काढल्या नंतर प्रदूषणही कमी होईल. दरम्यान भारतीय बाजारात वाढत असलेली इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहाता अनेक वाहन निर्माता कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉंच करत आहेत. तसेच या वाहनांना ग्राहकांचा प्रतिसाद देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

हेही वाचा: ऑनलाईन फ्रीमध्ये भरा तुमचा ITR; 31 डिसेंबर आहे शेवटची तारीख

Web Title: Nitin Gadkari Says Electric Vehicle And Petrol Diesel Vehicle Prices Will Be The Same In Two Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkari
go to top