
देशात लोकसंख्या आणि ऑटो मोबाइल ग्रोथसाठी फारसा प्रयत्न करावा लागत नाही असंही गडकरी म्हणाले.
हप्त्यावर टीव्ही घेणारा मी पहिलाच मंत्री असेन - नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या दिलखुलास वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. आताही त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, 'देशात दोन गोष्टींवर फारसा प्रयत्न करावा लागत नाही. एक जनसंख्या आणि दुसरी ऑटो मोबाईल ग्रोथ.' गडकरींनी यावेळी हप्त्यावर टीव्ही घेतल्याचा किस्साही सांगितला. आज देशात (India) गुंतवणूकदार स्वत:हून गुंतवणुकीसाठी सरकारकडे येत असल्याचं सांगताना गडकरी म्हणाले की, १९९५ मध्ये अशी परिस्थिती होती की, आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो. मात्र आता गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत.
हप्त्यावर टीव्ही घेणारा मी पहिलाच मंत्री असेल याचा किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, १९९५ मध्ये जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो तेव्हा बाजारात एक टीव्ही आला होता. मी पुण्यात एका दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराला म्हणालो मला इंस्टॉलमेंटमध्ये टीव्ही द्या. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. इंस्टॉलमेंट टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन. त्या दुकानदाराला समजले तेव्हा तो म्हणाला साहेब मी तुम्हाला नवीन पीस आला की देतो पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही.त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही इंस्टोलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही मिळत त्यावर मी विचार केला आणि पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवल्याचे नितीन गडकरींनी म्हटले.
हेही वाचा: कर्ज देणारे 'हे' App इन्स्टॉल किंवा लिंक ओपन कराल तर बसेल फटका
वरळी वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटींचा होता. नंतर तो प्रोजेक्ट गेला साडे आठशे कोटींवर गेला गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल. आता 12 तासात रस्त्याने मुंबई आणि दिल्ली जाता येईल. अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या. ज्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त उदाहरण आहे असे प्रकल्प मार्गी लावता येतील असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.
Web Title: Union Minister Nitin Gadkari Says If Tv On Installment Then Why Not Roads
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..