Nitin Gadkarisakal
देश
Nitin Gadkari : ‘देशांतर्गत आव्हाने असूनही पाकचे दहशतवादाला प्रोत्साहन’
Pakistan Terrorism : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानवर तीव्र टीका केली आहे की, गरिबी आणि बेरोजगारीने ग्रासलेले असतानाही ते दहशतवादाला प्रोत्साहन देत आहेत आणि त्याला निधी पुरवत आहेत.
नवी दिल्ली : ‘‘गरिबी, उपासमार आणि बेरोजगारी यासारख्या देशांतर्गत गंभीर आव्हानांचा सामना करीत असलेला पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देऊन त्यासाठी निधी पुरवत आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला.