Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय उलथापालथ; महाराष्ट्रातला बडा नेता निघाला पाटण्याला, उद्या महत्त्वाची बैठक

बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. नितीश कुमार भाजपसोबत जावून पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येतय. इंडिया आघाडी, जेडीयू आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली होताना दिसून येत आहेत.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal

पाटणाः बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. नितीश कुमार भाजपसोबत जावून पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं सांगण्यात येतय. इंडिया आघाडी, जेडीयू आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली होताना दिसून येत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी आहे. सध्या सुरु असलेला राजकीय गदारोळात तावडेंची भूमिका महत्त्वाची समजली जातेय. त्यामुळे ते पाटण्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी राज्य कार्यकारिणीची एक बैठक बोलावण्यात आलेली असून तावडे शनिवारी पाटण्यामध्ये असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, बिहारच्या राजकारणासाठी शनिवारचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. सर्वच महत्वाच्या पक्षांनी विधीमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. शनिवारी दुपारी १ वाजता RJD ने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

दुसारीकडे काँग्रेसनेही दुपारी १ वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ४ वाजता भाजपने आपल्या सर्व आमदारांना बैठकीसाठी सांगावा धाडला आहे. भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे शनिवारी पटण्याला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. बिहारच्या राजकारणात इतरही काही समीकरणे जुळतात का, याची RJD कडून चाचपणी सुरू असल्याचं कळतंय.

भाजपशी घरोबा का?

२०१७ मध्ये नितीश कुमार भाजपसोबत गेले होते. २०२२ मध्ये नितीश यांनी पुन्हा लालू यादव यांच्या आरजेडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते परत भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नितीश कुमारांनी आपली 'पलटू कुमार' अशी प्रतिमा कायम ठेवल्याची टीका होतेय.

याबाबत भाजपकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून कमी जागा मिळत असल्याने नितीश कुमारांनी असा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com