

Nitish Kumar
sakal
पाटणा : ‘‘बिहारी जनतेच्या सेवेसाठी तुम्ही मला २००५ पासून सातत्याने संधी दिली. मी जेव्हा मुख्यमंत्रिपद स्वीकारले तेव्हा ‘बिहारी’ असणे अपमानास्पद मानले जात असे. आता ‘बिहारी’ असणे अभिमानाची गोष्ट आहे,’’ असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्याच्या जलद विकासासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘एनडीए’ला मत देण्याचे आवाहन शनिवारी केले.