Nitish Kumar Hijab Controversy: नितीश कुमारांच्या ‘हिजाब’ प्रकरणातील 'ती' डॉक्टर तरूणी अखेर सरकारी नोकरीत झाली रुजू

या प्रकरानंतर खरंतर आधी संबधित तरूणीने सरकारी नोकरी फेटाळल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.
The woman doctor associated with the Nitish Kumar hijab case officially joins government service after prolonged legal and political debate.

The woman doctor associated with the Nitish Kumar hijab case officially joins government service after prolonged legal and political debate.

esakal

Updated on

Nitish Kumar hijab case : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात एका मुस्लिम तरूणीच्या चेहऱ्यावरील हिजाब हटवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती, शिवाय नितीश कुमारांवर विरोधकांना आणि मुस्लिम संघटनांनी जोरदार टीकाही केली होती. तसेच, संबधित तरूणीने सरकारी नोकरी फेटाळल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता अखेर ती डॉक्टर तरूणी सरकारी नोकरीत रुजू झाली असल्याची बातमी समोर आली आहे.

प्राप्त माहितीनुसार डॉक्टर नुसरत परवीन या २३ दिवसांनी पुन्हा त्यांच्या नोकरीत रुजू झाल्या आहेत. रुजू होण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर होती, जी प्रथम ३१ डिसेंबर आणि नंतर ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. तर सिव्हिल सर्जनने नुसरत यांच्या रुजू झाल्याची पुष्टी केली आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी, नियुक्ती पत्र वाटताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी डॉक्टर परवीन यांचा हिजाब ओढून हटवण्याचा प्रयत्न केला होता.

तर या आधी पाटणाच्या कदमकुआन भागातील सरकारी तिब्बी कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्य महफजूर रहमान यांनी सांगितले होते की, नुसरत परवीन या कॉलेजमध्ये येत आहे आणि त्या नोकरी रुजू करतील. तर त्याआधी आलेल्या वृत्तांनुसार नुसरतने हिजाब वादानंतर नोकरी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.

The woman doctor associated with the Nitish Kumar hijab case officially joins government service after prolonged legal and political debate.
Hijab Controversy Update : हिजाब विवादात नवीन अपडेट!, नुसरत परवीन नोकरी करणार, कुटुंबही नाराज नाही

प्राचार्य महफजूर रहमान म्हणाले होते की, "ती मुलगी सध्या पाटणामध्ये आहे. ती नोकरीत रुजू होईल; वाद संपला आहे. सर्वजण आनंदी आहेत. ती उद्या पाटणा सदर रुग्णालयात रुजू होईल. जिच्यासोबत घडले आहे ती सध्या ठीक आहे, परंतु जग विनाकारण वेड्यासारखं वागत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com