CM Nitish Kumar Hijab Controversy
esakal
Nusrat Parveen Takes Decision to Continue Job : पाटणाच्या कदमकुआन भागातील सरकारी तिब्बी कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्राचार्य महफजूर रहमान यांनी सांगितले आहे की नुसरत परवीन या कॉलेजमध्ये येत आहे आणि ती नोकरी रुजू करेल. याआधी आलेल्या वृत्तांनुसार नुसरतने हिजाब वादानंतर नोकरी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.
१५ डिसेंबर रोजी नियुक्ती पत्रे वाटताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भर कार्यक्रमात नुसरतच्या चेहऱ्यावरून हिजाब काढण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली.
आता प्राचार्य महफजूर रहमान म्हणाले आहेत की, "ती मुलगी सध्या पटणामध्ये आहे. ती नोकरीत रुजू होईल; वाद संपला आहे. सर्वजण आनंदी आहेत. ती उद्या पाटणा सदर रुग्णालयात रुजू होईल. जिच्यासोबत घडले आहे ती सध्या ठीक आहे, परंतु जग विनाकारण वेड्यासारखं वागत आहे."
याशिवाय प्राचार्यांनी सांगितले की, त्यांची मैत्रीण बिलिकस परवीन हिच्याशी माझे बोलणे झाले आहे. तिने मला ही माहिती दिली आहे. नुसरत परवीन हिच्या कुटुंबाशीही माझे बोलणे झाले आहे. मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनीही मला माहिती दिली आहे. नुसरत अजिबात घाबरलेली नाही, धास्तावलेली नाही आणि तिचे कुटंबही नाराज नाही.
नितीश कुमारांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली, तर सत्ताधारी पक्षाने मुख्यमंत्र्यांचा बचाव केला. जेडीयूने म्हटले की नितीश कुमार यांनी पितृत्वाची वृत्ती दाखवून कृती केली. तर बिहारच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या. याशिवाय, धार्मिक नेत्यांनीही नितीश कुमारांवर टीका सुरू केली आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करणारी औपचारिक तक्रार दाखल केली. एवढंच नाहीतर या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या इनपुटच नंतर नितीश कुमारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.