निवारागृहातील सेक्स स्कँडलप्रकरणी नितीशकुमारांचीही चौकशी करा

वृत्तसंस्था
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने शुक्रवारीच हे आदेश दिले. 

निवारागृहातील मुलींना बेशुद्धीचे इंजेक्‍शन देऊन ती संबंधीत शोषणकर्त्याकडे पाठविण्याचे काम अश्‍विनी करत असे, या प्रकरणामध्ये सीबीआय सत्य माहिती दडविण्याचे काम करत असून ती झाली तर सत्य बाहेर येईल, असे अश्‍विनीने म्हटले होते. मुझफ्फरपूरचे माजी जिल्हाधिकारी धर्मेंद्र सिंह, ज्येष्ठ आयएएस अधिकारी अतुलकुमार सिंह आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांचीही चौकशी केली जावी, अशी मागणी आरोपीने केली होती. यावर पॉस्को न्यायालयाचे न्या. मनोजकुमार यांनी सीबीआयला या सर्वांचीच चौकशी करण्याचे आदेश दिले. संबंधित निवारागृहाला 2013 पासून नियमित अनुदान मिळते आहे. येथील कर्मचारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत आहे.

दैनांदिन तपासादरम्यान वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक क्‍लीनचिट देत असत, असा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने संबंधित खटला दिल्लीतील साकेत येथील विशेष पॉस्को न्यायालयात वर्ग केला असून त्यावर राजधानीत पुढील आठवड्यापासून सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: Nitish Kumar Inquire about Sex scandal case