Nitish Kumar: नितीश कुमारांची लवकरच होणार इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्तीची घोषणा - सूत्र

इंडिया आघाडीतील पक्षांच्या व्हर्च्युअल बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची लवकरच इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्तीची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुत्रांच्या हवाल्यानं इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांची व्हर्च्युअल बैठक आजच होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आली असून आता या आठवड्यात ही बैठक कधीही होऊ शकते. या बैठकीत नितीश कुमारांच्या नावाची समन्वयकपदी घोषणा होण्याची शक्यता आहे. (Nitish Kumar likely to be appointed convenor of INDIA bloc

Nitish Kumar
Ayodhya Ram Mandir : राम मंदिर आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदींचं पक्षात स्थान काय होतं? त्यांच्या शब्दाला किती महत्व होतं?

आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा

इंडिया आघाडीच्या नियोजित समन्वयकपदाबाबत काँग्रेसनं मंगळवारी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख अन् बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली. तसेच आघा

डीतील इतर पक्षांशी देखील चर्चा करण्यात आली आहे. त्याचबरोबर नितीश कुमार यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली आहे. (Marathi Tajya Batmya)

Nitish Kumar
Kerala High Court: पतीने संमतीविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्यास पत्नीला घटस्फोटाचा अधिकार; न्यायालयाचा मोठा निर्णय!

केजरीवालांचा, उद्धव ठाकरेंचाही पाठिंबा

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल आणि इतर प्रमुख नेत्यांनी देखील नितीश कुमार यांच्या समन्वयकपदासाठी पाठिंबा दिला आहे. यासंबंधी शिवसेनेचे नेते उद्दव ठाकरे हे अरविंद केजरीवाल यांच्यासोबतही चर्चा करतील असं म्हटलं आहे. (Latest Marathi News)

नितीश कुमार यांची इंडिया आघाडी स्थापन करण्यात महत्वाची भूमिका होती. तसेच काँग्रेसलाही यामध्ये काहीही अडचण नाही, या आघाडीत दोन मोठी पदं आहेत यांपैकी एक अध्यक्ष आणि दुसरं समन्वयक हे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com