

Nitish Kumar taking oath as Bihar Chief Minister in the presence of Prime Minister Narendra Modi during a grand swearing-in ceremony.
esakal
Nitish Kumar oath ceremony update : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीयमंत्री आणि एनडीए आघाडीच्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह दिग्गजांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच बिहारमधील ऐतिहासिक गांधी मैदानावर पंतप्रधान मोदींचे हेलिकॉप्टरमधून आगमन झाले होते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.
गांधी मैदानावरील समारंभाला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा येथे पोहोचले असतानाच, गांधी मैदानावर मान्यवरांची गर्दी वाढली होती. गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी आणि उपेंद्र कुशवाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदी व्यासपीठावर आधीच पोहोचले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.