Bihar : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Political Latest News

Bihar : नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Bihar Political Latest News पाटणा : नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिल्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ‘असे करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. आम्ही २०२०च्या विधानसभा निवडणुका एनडीएअंतर्गत एकत्र लढल्या होत्या. जनादेश जेडीयू आणि भाजपसोबत (BJP) होता. आम्ही जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते बिहारच्या जनतेशी व भाजपशी विश्वासघात आहे, असे पत्रकार परिषदेत बिहार भाजपचे प्रमुख संजय जयस्वाल म्हणाले.

मंगळवारी (ता. ९) सकाळी जेडीयू आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली होती. यानंतर नितीश कुमार यांनी दुपारी चार वाजताच्या सुमारास राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा (Resignation) सुपूर्द केला. नितीश कुमार राजभवनात पोहोचले तेव्हा समर्थकांचा मोठा जमाव ‘जिंदाबाद’च्या घोषणा देत होता.

हेही वाचा: AAP : गोव्यात आप राज्य मान्यताप्राप्त पक्ष; निवडणूक आयोगाने दिली मान्यता

जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपवर अपमानित केल्याचा आरोप केला. त्याचवेळी त्यांनी त्यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप केला. नंतर नितीश कुमार हे तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी रवाना झाले. भाजपशी (BJP) युती तोडल्यानंतर नितीश कुमार आता आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करतील, अशी शक्यता आहे.

२०२० च्या बिहार (Bihar) विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयूने २४३ जागांपैकी ४५ जागा जिंकल्या. तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवून राज्याची कमान त्यांच्याकडे सोपवली होती. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ७९ जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने १९ जागा जिंकल्या. तर हमला ४ जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा १२२ आहे.

Web Title: Nitish Kumar Resignation Bjp First Reaction Bihar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BiharBjpnitish kumar