Goa Election Commission, AAP Latest News
Goa Election Commission, AAP Latest NewsGoa Election Commission, AAP Latest News

AAP : गोव्यात आप राज्य मान्यताप्राप्त पक्ष; निवडणूक आयोगाने दिली मान्यता

दिल्ली, पंजाबनंतर गोव्यातही आप हा राज्य मान्यताप्राप्त पक्ष आहे

Goa Election Commission, AAP Latest News नवी दिल्ली : आम आदमी पक्षाला (आप) निवडणूक आयोगाकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाला गोव्यात (Goa) ‘राज्य मान्यताप्राप्त पक्ष’ (State Recognized Party) असा दर्जा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे संस्थापक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. त्याचवेळी आम्हाला दुसऱ्या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून घोषित केले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, गोवा विधानसभेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या मतदानाच्या कामगिरीच्या पुनरावलोकनाच्या आधारे असे निदर्शनास आले आहे की, आम आदमी पक्ष (AAP) सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष आहे. झाडू हा त्यांचा आरक्षित चिन्ह आहे.

Goa Election Commission, AAP Latest News
नितीश कुमार अस्वस्थ; उद्धव ठाकरेंची स्थिती, नड्डांच्या वक्तव्याने वाटू लागली भीती!

गोव्यात (Goa) राज्य पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या पॅरा ६A मध्ये घातलेल्या अटी पूर्ण करतो. आयोगाच्या म्हणण्यानुसार, आम आदमी पक्षाला गोवा राज्यातील निवडणूक चिन्हे (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८ च्या तरतुदींनुसार राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली जात आहे.

दिल्ली आणि पंजाबनंतर आता गोव्यातही आप हा राज्य मान्यताप्राप्त पक्ष (State Recognized Party) आहे. दुसऱ्या राज्यात मान्यता मिळाल्यास आम्हाला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्ष म्हणून घोषित केले जाईल. मी प्रत्येक स्वयंसेवकांचे त्यांच्या मेहनतीबद्दल अभिनंदन करतो. आप आणि तिच्या विचारसरणीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी लोकांचे आभार मानतो, असे ट्विट अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com