‘सीएए’च्या प्रश्‍नावर नितीशकुमारांचे स्मितहास्य

पीटीआय
Thursday, 16 January 2020

मकर संक्रांतीचा सण आहे, या दिवशी विभिन्न मत असणारे मुद्दे उपस्थित करू नका, अशी पत्रकारांना विनंती करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. स्मितहास्य आणि हात जोडत त्यांनी पत्रकारांना उत्सवाचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले.

पाटणा - मकर संक्रांतीचा सण आहे, या दिवशी विभिन्न मत असणारे मुद्दे उपस्थित करू नका, अशी पत्रकारांना विनंती करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. स्मितहास्य आणि हात जोडत त्यांनी पत्रकारांना उत्सवाचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेडीयूचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार वशिष्ठ नारायण सिंह यांच्या निवासस्थानी मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित पत्रकारांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी याबाबत नितीशकुमार यांना प्रश्‍न विचारला असता त्यांनी स्मितहास्य केले आणि हात जोडले. सणाच्या दिवशी असे प्रश्‍न उपस्थित करू नका. मकरसंक्रांतीच्या सणाचा आनंद घ्या आणि १९ जानेवारीपासून राज्यव्यापी मानवी साखळीबाबत लिहा असे आवाहन त्यांनी केले. आपणही त्यात सहभागी व्हावे असे नितीशकुमार पत्रकारांना उद्देशून म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitish Kumar smile on CAA question