
Bihar Politics : नितीश कुमार यांनी आठव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
पाटणा : बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि राजदप्रणित महागठबंधन यांचं संयुक्त सरकार स्थापन झालं. यावेळी नितीश कुमार यांनी आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. भाजपला सोडचिठ्ठी देत नितीश कुमार यांनी महागठबंधनसोबत नवं सरकार स्थापन केलं आहे. बिहारच्या राजभवनात हा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. (Nitish Kumar took oath as Chief Minister for the eighth time)
राजभवन येथील या शपथविधी सोहळ्याला लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव यांच्या पत्नी राजश्री यादव, माजी मुख्यमंत्री राबडी देवी तसेच राजदचे नेते तेज प्रताप यादव हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, शपथविधीनंतर माध्यमांशी बोलताना CM नितीश कुमार म्हणाले, भाजप सोडण्याचा निर्णय पक्षानं एकत्रितपणे घेतला. सन २०२४ पर्यंत पदावर राहिल किंवा नाही हे सांगू शकत नाही. त्यांना काय बोलायचंय ते बोलू शकतात. पण मी सन २०१४ मध्येच अद्याप राहू शकत नाही.
तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या कुटुंबियांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. तेजस्वी यादव म्हणाले, बिहार माझं कुटुंब आहे. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या पत्नीनं म्हटलं तर बिहारसाठी ही चांगली गोष्ट घडली. मी सर्वांचे आभार मानते असं तेजस्वी यांच्या आई राबडी देवी यांनी म्हटलं आहे. आम्ही काम करण्यासाठी सत्तेत आलो आहोत असं तेज प्रताप यादव यांनी म्हटलं आहे.