esakal | "नितीश कुमार मुख्यमंत्री असतील, पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल''
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi and nitish kumar

नितीश कुमार एनडीए युतीचे एक मजबूत नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पण,

"नितीश कुमार मुख्यमंत्री असतील, पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल''

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अनवर यांनी नितीश कुमार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले तरी यावेळी राज्याच्या कारभाराचा रिमोट दुसऱ्याच्या हातात असेल. नितीश एक रिमोटने चालवले जाणारे मुख्यमंत्री होतील, असं ते म्हणाले आहेत. वृत्त संस्था एएनआयशी बोलताना अनवर यांनी हे वक्तव्य केलं. भाजपणे जाणूनबुजून आणि राजकीय रणनितीने नितीश कुमारांना कमकुवत केले आहे, असंही ते म्हणाले आहेत. 

नितीश कुमार एनडीए युतीचे एक मजबूत नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. पण, यावेळी भाजप त्यांना रिमोट कंट्रोलने चालणारा मुख्यमंत्री बनवत आहे, असं तारिक अनवर म्हणाले आहेत. अनवर यांच्या काँग्रेस पक्षाने महाआघाडीअंतर्गत 70 जागांवर निवडणूक लढवली होती. पण, यातील 19 जागाच त्यांच्या पक्षाला जिंकता आल्या आहेत. महाआघाडीने जागा वाटपाला उशीर केला होता. त्यामुळे प्रचार व्यवस्थित होऊ शकलेला नाही, असं अनवर म्हणाले होते.

'भाजपच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पदी; माझी इच्छा नव्हतीच'

आरजेडीचे प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य मनोज झा यांनीही नितीशकुमार यांच्यावर तोंडसुख घेतले आहे. नितीश कुमारांकडे काठावरचे बहुमत असून हे सरकार जास्त दिवस टिकणार नसल्याचे ते म्हणाले आहेत. 40 जागा जिंकून कोणी मुख्यमंत्री कसा बनू शकतो ? जनादेश त्यांच्या विरोधात आहे. त्यांना नाकारण्यात आले आहे. यावर त्यांनी स्वतः विचार करायला हवा. बिहारला त्यांचा पर्याय मिळेल, सहज मिळेल. यासाठी एक आठवडा, दहा दिवस किंवा एक महिना लागू शकतो. पण असे निश्चितच होणार, असं झा म्हणाले. 

दरम्यान, एनडीएच्या बैठकीत नितीश कुमारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. ते बिहार राज्याचे सातव्यांदा मुख्यमंत्री होतील. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. उद्या (सोमवारी) सायंकाळी नितीश कुमारांचा शपथविधी होईल. निवडणुकीत भाजपला 74 जागा तर जेडीयूला फक्त 43 जागा मिळाल्या आहेत. एनडीएला 125 जागा मिळाल्या असून अगदी निसटत्या अशा स्वरुपाचा विजय प्राप्त झाला आहे. दुसरीकडे तेसस्वी यादव यांच्या राजदने चांगली कामगिरी केली असून पक्षाला 75 जागा मिळाल्या आहेत. राजद राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.