2019 निवडणुकांमध्ये नितीशकुमार 'एनडीए'सोबत ?

वृत्तसंस्था
रविवार, 8 जुलै 2018

संयुक्त जनता दल 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एनडीएसोबत असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या बुधवारी (12 जुलै) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पटना येथे नितीशकुमार यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये जागावाटपावरून चर्चा केली जाणार आहे.

नवी दिल्ली : दिल्लीच्या बिहार भवन येथे संयुक्त जनता दलाची (जेडीयू) दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्यात आला असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार असल्याचे सांगितले जात आहे. 

संयुक्त जनता दल 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एनडीएसोबत असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या बुधवारी (12 जुलै) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पटना येथे नितीशकुमार यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान विधानसभा निवडणुकांमध्ये जागावाटपावरून चर्चा केली जाणार आहे. या जागावाटपानंतरच नितीशकुमार लोकसभा निवडणुकीत एनडीएसोबत राहणार की नाही, याबाबत स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. 

जागावाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जेडीयू नेते के. सी. त्यागी यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला असून, अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.  

दरम्यान, जेडीयू आणि भाजपमध्ये जागा वाटपाबाबत वाद सुरु आहे. जेडीयूने यापूर्वीच लोकसभा निवडणुकांमध्ये 25 जागांची मागणी केली आहे. मात्र, जागावाटपाबाबत आता कोणतीही अडचण नाही, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. 

Web Title: Nitish will contest 2019 within NDA on assembly polls have right to decide