Video: माझ्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

'सत्य शोधण्यासाठी कोणी मुर्ख माझ्यावर खटला दाखल करू शकत नाही. मी शिव आहे. माझ्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा...,' असे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंदने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

नवी दिल्लीः 'सत्य शोधण्यासाठी कोणी मुर्ख माझ्यावर खटला दाखल करू शकत नाही. मी शिव आहे. माझ्याशी पंगा घेऊ नका, अन्यथा...,' असे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंदने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नित्यानंद याने स्वतःचा एक देशच स्थापन केल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेजवळ एक बेट विकत घेऊन त्याने "कैलासा' नावाचा देश स्थापन केल्याचे वृत्त एका इंग्रजी माध्यमाने दिले आहे. नित्यानंदवर कर्नाटकमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खटल्यांची सुनावणीही सुरू आहे. यात अपहरण, लैंगिक शोषण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच, गुजरातमध्येही अहमदाबादमधील त्याच्या आश्रमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. "कैलासा' देशाचे निश्‍चित स्थान हे अद्याप गूढ असले, तरी नित्यानंदने दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर या देशाकडून हे बेट विकतच घेतल्याची माहिती मिळाली आहे. तामिळनाडूचा असलेल्या नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असे आहे. भारताने नित्यानंदचा पासपोर्ट रद्द केला आहे.

व्हिडिओमध्ये नित्यानंदने म्हटले आहे की, 'संपूर्ण जग माझ्याविरुद्ध आहे. पण मी सांगतो नित्यानंदशी पंगा घेऊ नका. जर तुम्ही इथं येऊन निष्ठा दाखवाल तर मी तुम्हाला वास्तव आणि सत्य सांगून माझी निष्ठा दाखवेन. आता मला कोणीही हात लावू शकत नाही. मी परम शिव आहे. समजले. सत्य शोधण्यासाठी कोणी मुर्ख माझ्यावर खटला दाखल करू शकत नाही. मी शिव आहे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nityanand video viral on social media who accused in rape case