
नवी दिल्ली: दिल्लीतील निजामुद्दीन भागात शुक्रवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली आहे. निजामुद्दीन दर्गा शरीफ पत्ते शाह येथील एका हुजऱ्याची (खोलीची) छत अचानक कोसळली, यामध्ये अनेक लोक दबले गेले. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ३ वाजून ५० मिनिटांनी ही घटना घडली. घटनेच्या ठिकाणी पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफची पथके दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे.