esakal | विमाने खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही
sakal

बोलून बातमी शोधा

AK Antony

विमाने खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याखेरीज दुसरा पर्याय नाही

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राफेल लढाऊ विमाने (Rafale Fighter) खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचाराची (Corruption) संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशी (Inquiry) करण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय (Option) उरलेला नाही, असे शरसंधान माजी संरक्षण मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी (AK Antony) यांनी केले आहे. (No Alternative but to Investigate Corruption in Aircraft Procurement AK Antony)

फ्रान्समधील चौकशीचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे, की राफेल प्रकरणात प्रथमदर्शनी भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट आहे. मोदी सरकारचे यावरील सूचक मौन भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचे निदर्शक आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यास भाजपचा नकार त्याहून धक्कादायक आहे.

हेही वाचा: पाकने 'RAW' वर केला हाफिजच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप

अँटनी यांनी पुढे म्हटले आहे, की मोदींनी १० एप्रिल २०१५ पॅरिसमध्ये जाऊन ३६ राफेल खरेदीची एकतर्फी घोषणा केली. निविदा न काढता आणि खरेदी प्रक्रिया धाब्यावर बसवून झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संरक्षण साहित्य खरेदी व्यवहारामुळे तज्ज्ञांनाही धक्का बसला. १२६ ऐवजी फक्त ३६ विमाने खरेदीचा निर्णय का घेतला आणि तंत्रज्ञान हस्तांतर का वगळले, या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांकडून आजतागायत आलेली नाहीत.

४८ तास उलटूनही मौन

राफेल खरेदीच्या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत समोर आलेले दस्तऐवज भ्रष्टाचार झाल्याच्या काँग्रेसच्या आरोपांना पुष्टी देणारे आहेत. एवढेच नव्हे तर ४८ तास उलटूनही (फ्रान्समधील चौकशीच्या निर्णयाला) मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथसिंह गप्प आहेत. पुढे येऊन सत्य स्वीकारण्याची सरकारची जबाबदारी नाही काय, असा सवाल अँटनी यांनी केला आहे.

loading image