
राज्यात गरजेनुसार रक्तपेढी ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यांना रक्तपेढी उभारणीसाठी किंवा विस्तार करण्यासाठी मदत केली जाते.
नवी दिल्ली -सप्टेंबर २०२० पर्यंत देशातील ६३ जिल्ह्यांत रक्तपेढी नसल्याची माहिती आज राज्यसभेत आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
देशातील सर्व जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी याबाबत सरकारने काही पावले उचलली आहेत काय? असा प्रश्न आरोग्य राज्यमंत्री चौबे यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले, की सार्वजनिक आरोग्य हा राज्याचा विषय असून राज्यात गरजेनुसार रक्तपेढी ठेवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यांना रक्तपेढी उभारणीसाठी किंवा विस्तार करण्यासाठी मदत केली जाते. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्यूजन कौन्सिल, आरोग्य मंत्रालय यांनी रक्तपेढीबाबत धोरण आखले असून त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात किमान एक रक्तपेढी असावी, असा नियम आहे. देशात रक्त पुरवठ्याबाबत एकही तक्रार आली नसल्याचे चौबे यांनी सांगितले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
१६२ डॉक्टरांचा कोविडमुळे मृत्यू
कोविडमुळे देशभरात आतापर्यंत १६२ डॉक्टरांचा, १०७ परिचारिका आणि ४४ आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी २२ जानेवारीपर्यंत असल्याचे आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी सांगितले.