

digital arrest letter yogi adityanath.jpg
sakal
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील जनतेच्या आर्थिक आणि मानसिक सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकत 'योगी की पाती' या नावाने एक विशेष पत्र प्रसिद्ध केले आहे.
गेल्या काही काळात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली निष्पाप नागरिकांची होणारी लूट पाहता, मुख्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे जनतेला वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. 'तुमची जागरूकता हाच सायबर गुन्हेगारांविरुद्धचा सर्वात मोठा अस्त्र आहे," अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेश दिला आहे.