
नवी दिल्ली : ‘‘अमलीपदार्थांच्या तस्करांना कसलीही दयामाया दाखवली जाणार नाही,’’ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी समाज माध्यमातून दिला. मणिपूरमधील इंफाळ तसेच आसाममधील गुवाहाटी येथे अलिकडेच ८८ कोटी रुपये किंमतीच्या मेथमफेटामाईन गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.