esakal | 'मला कुणाचा बाप अटक करू शकत नाही' : रामदेव बाबा
sakal

बोलून बातमी शोधा

ramdev baba

केंद्र सरकार महामारी कायद्यानुसार जर रामदेव बाबांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आयएमएनं दिला आहे.

'मला कुणाचा बाप अटक करू शकत नाही' : रामदेव बाबा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशभरात चांगलाच गदारोळ माजला. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) उत्तराखंडने रामदेवबाबांना एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस पाठवली असून पुढील १५ दिवसात लेखी माफी मागण्यासही सांगितले आहे. त्यानंतर आता रामदेव बाबा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. (No one can arrest me says Ramdev Baba after IMA sends defamation notice)

अॅलोपॅथीवरून सुरू झालेल्या वादावर रामदेव बाबा म्हणाले की, 'कुणाचा बापही रामदेवला अटक करू शकत नाही.' सोशल मीडियावर #ArrestBabaRamdev ट्रेंड सुरू होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून रामदेव बाबांनी आणखी एक वक्तव्य केलं आहे. रामदेवला अटक करण्यासाठी ते गोंधळ घालत आहेत. कधी ठग रामदेव, तर कधी महाठग रामदेव म्हणून ट्रेंड चालवत आहेत. ते काही बोलले की लोकांनाही उठसूठ ट्रेंड चालवण्याची सवय झाली आहे.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

दरम्यान, आयएमए उत्तराखंडने रामदेव बाबांवर एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा केला आहे. रामदेव बाबांना अॅलोपॅथीचा ए देखील माहित नाही. त्यांनी विचारलेल्या २५ प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही तयार आहोत, त्याआधी त्यांनी स्वत:ची योग्यता सिद्ध करावी. तसेच केंद्र सरकार महामारी कायद्यानुसार जर रामदेव बाबांवर कारवाई करणार नसेल, तर आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू, असा इशारा आयएमएनं दिला आहे.

रामदेव नक्की काय म्हणाले होते?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रामदेव बाबा म्हणतात की, कोरोना महामारीमुळे होत असलेल्या मृत्युमागे अॅलोपॅथीचं कारण सांगण्यात येत आहे. अॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्युंपेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.