Article 370 : पाकिस्तान पडतोय एकटा; मुस्लिम देशांनी सोडली साथ

वृत्तसंस्था
Thursday, 8 August 2019

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर आंतराराष्ट्रीय स्तरावर मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानंतर आता भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली करणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरबसह मुस्लिम देशांनी संबंध तोडले आहेत.

कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात भूमिका घेणे सुरु केले आहे. त्यानुसार पाकिस्तानने भारतासोबत द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत.

तसेच काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर आता समझोता एक्स्प्रेसही थांबविली. भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No One muslim countries with pakistan after india Removed article 370 in kashmir