पगार २५ हजार सांगून १५ हजारच देतात, २५० रुपये वाढ देऊन उपकार केल्याचं दाखवतात; कंपन्यांकडून लूट, कर्मचाऱ्यांचा संताप

Noida Private Employee Protest नोएडात खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनाला सोमवारी सकाळी हिंसक वळण लागलंय. आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत.
Noida employees protest over salary issues violence erupts on roads

Noida employees protest over salary issues violence erupts on roads

Esakal

Updated on

नोएडात गेल्या तीन वर्षांपासून खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पगारवाढ, अन्यायकारक अटी शर्थी यामुळे कर्मचाऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. रविवारपर्यंत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी आणि शांततेत आंदोलन केलं. पण सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेकडो कर्मचारी रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झालं आहे. काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. तर काही ठिकाणी गाड्या जाळल्याचे प्रकारही घडले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com