Noida International Airport : २५ वर्षांचे स्वप्न साकार! नोएडा विमानतळावरून व्यावसायिक विमानसेवा सुरू; १७२ शेतकऱ्यांना घेऊन पहिले विमान रवाना

First Commercial Flight : केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांच्या उपस्थितीत चार शहरांसाठी (लखनौ, बेंगळुरू, हैदराबाद, अमृतसर) सेवा सुरू झाली. नोएडा विमानतळ लवकरच देशातील टॉप 5 विमानतळांमध्ये स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
IndiGo’s first commercial flight departs from Noida International Airport (Jewar)

IndiGo’s first commercial flight departs from Noida International Airport (Jewar)

esakal

Updated on

Farmers Honored on Inaugural Jewar Airport Flight : पश्चिम उत्तर प्रदेशातील जनतेने २५ वर्षांपासून पाहिलेले स्वप्न अखेर सोमवारी सत्यात उतरले. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (जेवर विमानतळ) पहिली व्यावसायिक विमानसेवा सुरू होऊन इतिहास घडला. इंडिगोच्या विमानाने १७२ शेतकऱ्यांना घेऊन लखनौकडे उड्डाण केले; हे तेच शेतकरी आहेत ज्यांनी विमानतळाच्या उभारणीसाठी आपली जमीन दिली होती. या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू देखील उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com