esakal | प्रेमासाठी काय केलं? पत्नी, मुलांची हत्या करुन तळघरात पुरले मृतदेह
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमासाठी काय केलं? पत्नी, मुलांची हत्या करुन तळघरात पुरले मृतदेह

प्रेमासाठी काय केलं? पत्नी, मुलांची हत्या करुन तळघरात पुरले मृतदेह

sakal_logo
By
दीनानाथ परब

नोएडा: गुन्हा (Crime) करुन कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरी कधी ना कधी गुन्हा बाहेर येतोच. उत्तर प्रदेशात (uttar pradesh) नोएडामध्ये (noida) तब्बल तीन वर्षानंतर एका धक्कादायक गुन्ह्याची उकल झाली आहे. राकेश (३४) असं आरोपीचं नाव आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये गुन्हा करणाऱ्या आरोपीला तब्बल तीन वर्षानंतर बुधवारी पोलिसांनी (police) अटक केली. राकेशने पत्नी रत्नेश (२७) मुलं अवनी (३) आणि अर्पितची (१) हत्या करुन त्यांचे मृतदेह घरातल्या तळघरात पुरले होते.

मित्राची हत्या का केली?

पत्नी आणि पोटच्या मुलांची हत्या करुन राकेश थांबला नाही, तर त्याने कासगंज ढोलना भागामध्ये मित्र राजेंद्रची हत्या केली व त्याच्या मृतदेहाजवळ स्वत:चे आयडी कार्ड फेकले. जेणेकरुन आपला मृत्यू झालाय, असा जगाचा समज व्हावा. राकेशने हे सर्व स्वत:चे विवाहबाह्य संबंध कायम ठेवण्यासाठी केलं. पत्नी रत्नेशच्या कुटुंबीयांनी मुलगी आणि नातवंड बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. तीन वर्षाच्या या काळात राकेश दुसऱ्या नावाने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि उत्तर प्रदेशात आरामात राहत होता.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांची आरती करत, मंदिर उघडण्यासाठी मनसे आक्रमक; पाहा व्हिडिओ

एप्रिल २०१८ मध्ये कासगंज ढोलना भागात मृतदेह मिळाल्यानंतर राकेशचे वडिल बनवारीलाल यांनी तो आपल्या मुलाचा मृतदेह असल्याचे सांगितले. ते सुद्धा या कटात सहभागी होते. तीन वर्षानंतर कासगंज पोलिसांना एक टीप मिळाली. राकेश बनावट नाव धारण करुन राहत असल्याचं समजलं. त्यांनी बुधवारी त्याला अटक केली. राकेश सोबत त्याचे वडिल बनवारीलाल यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली.

हेही वाचा: फेरीवाले कुठे बसतात शिवसेनेला माहीत नाही का? - शर्मिला ठाकरे

कासगंज पोलीस पिता-पुत्रांना चिपयाना येथे घेऊन आले. तेथे राकेश आधी राहत होता. घराच्या तळघरात खोदकाम केल्यानंतर तीन सांगाडे सापडले. मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी ते सांगाडे डीएनए तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

loading image
go to top