esakal | फेरीवाले कुठे बसतात शिवसेनेला माहीत नाही का? - शर्मिला ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray s wife Sharmila Thacekray says that she is with Raj in every situation

फेरीवाले कुठे बसतात शिवसेनेला माहीत नाही का? - शर्मिला ठाकरे

sakal_logo
By
वैदेही काणेकर

मुंबई: "आमचे आमदार, नगरसेवक, खासदार यांना त्यांच्या फंडातून लसी मिळू शकतात. आमचे आमदार राजू पाटील, (raji patil) नगरसेवक संजय तुरडे यांनी स्वतःच्या निधीतून लसी उपलब्ध (vaccination) करून दिल्या. मग हे तर सरकारमध्ये आहेत त्यांना तर मिळूच शकतात. विकत घेऊन लस देऊ शकतात पण विकत घेतली तर पाहिजे. जर प्रत्येक नगरसेवकांनी, आमदारांनी आपापला एरिया कव्हर केला तर नक्कीच लसीकरण पूर्ण होऊ शकतं. होर्डिंग न लावता लसीकरण करा" असं शर्मिला ठाकरे (sharmila Thackeray) यांनी म्हटलं आहे. त्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj tahckeray) यांच्या पत्नी आहेत.

"लसीकरण पूर्ण करण्यासाठी इच्छाशक्ती हवी. इच्छाशक्ती असेल तर लसीकरण व्यवस्थित होईल" असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ठाण्यात पालिकेतील महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने हल्ला केला. या विषयावर त्या म्हणाल्या की, "२५ वर्षे शिवसेना सत्तेत आहे, मग अनधिकृत फेरीवाले कुठे बसतात हे माहीत नाही का यांना? महापौर, स्टँडिंग पासून सगळे तुमचेच. इच्छाशक्ती असेल तर सगळं करू शकता."

हेही वाचा: CBI पथक देशमुखांच्या वकिलाला घेऊन गेलं दिल्लीला

वरूण सरदेसाईने केलेल्या सगळ्या गोष्टीला परवानगी

"युवासेनाचा नागपूरला मेळावा होता. गर्दी तुम्ही दाखवली होती. वरूण सरदेसाईने केलेल्या सगळ्या गोष्टीला परवानगी आहे. भास्कर जाधव, राहुल शेवाळे यांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे का? पेढेवाले, फुलवाले ,शेतकरी सगळ्यांचे पोट मंदिरांवर अवलंबून आहे. ही सायकल खूप मोठी आहे. गेल्या कोरोना काळात किती शेतकऱ्यांनी फुलं फेकली, दूध ओतून दिलं, गाय दूध देणारच कोरोना म्हणून थांबणार नाही. इकॉनॉमीचा विचार केला पाहिजे" असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

loading image
go to top