

Tragic Incident in Noida
Sakal
नोएडा : नोएडाच्या सेक्टर-९४ मधील एका बहुमजली इमारतीवरून उडी मारून गुरुग्राममधील एका तरुणाने जीवन संपविल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. 'सुपरनोवा' सोसायटीच्या इमारतीत ही दुर्घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.