

Who Was the 28-Year-Old Software Engineer?
esakal
दिल्ली-एनसीआरमधील उंच इमारतींपैकी एक असलेल्या ‘सुपरनोव्हा’च्या ४३व्या मजल्यावरून उडी मारून २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. मृताची ओळख गुरुग्राममधील मानेसर येथील रहिवासी संभव जैन अशी झाली आहे. प्राथमिक तपासात संभव गेल्या काही काळापासून नैराश्याचा सामना करत असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वाद, मुलाच्या उपचारांसाठी झालेला मोठा खर्च आणि कर्जाचा ताण यामुळे तो मानसिक दबावाखाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.