नोएडा : दिल्ली-एनसीआर परिसरातील नोएडा (Noida) शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक युवक रक्ताने माखलेला, फाटके कपडे घालून हातात मोठा दगड घेऊन रस्त्यावर चालताना दिसतोय. तेवढ्यात मागून आलेल्या थार एसयूव्हीने (Thar SUV) त्याला जोराची धडक दिली आणि तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात फेकला गेला.