Shrikant Tyagi : पोलिस मागावर अन् गुंड श्रीकांत त्यागीनं बदलल्या १५ गाड्या, मोबाईल फोन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shrikant Tyagi_Noida

पोलिस मागावर अन् गुंड श्रीकांत त्यागीनं बदलल्या १५ गाड्या, मोबाईल फोन!

नवी दिल्ली : भाजप नेता गुंड श्रीकांत त्यागी नोएडातील एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी फरार होता. त्याला मंगळवारी मेरठ येथून पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्यागीला पकडण्यासाठी जोरदार मोहिम हाती घेतली होती. पोलीस आपल्या मागावर असल्याचं कळताच त्यागीनं बचावासाठी १५ गाड्या बदलल्या. इतकचं नव्हे त्यांनं अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि डिव्हाईसही बदलले. कसा घडला हा त्यागीच्या अटकेचा थरारक प्रवास जाणून घेऊयात. (Noida to Meerut goon leader Shrikant Tyagi changed cars 15 times to evade cops)

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांच्या ८ टीम त्यागीला पकडण्यासाठी रवाना झाल्या होत्या. त्यानंतर युपी एसटीएफच्या टीम देखील या मोहिमेत सहभागी झाल्या. तसेच युपी एसटीएफची पाळत ठेवणारी एक टीमही या स्वयंघोषीत भाजप नेत्याच्या शोधासाठी रवाना झाली होती.

योगी सरकारनं त्यागीला पुरवली होती सशस्त्र सुरक्षा

श्रीकांत त्यागीच्या भाजपशी असलेल्या संबंधांची चौकशी सुरू असताना बुधवारी नवीन माहिती समोर आली. भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असल्याचा दावा त्यागीनं केला होता. 8 ऑक्टोबर 2018 रोजी योगी आदित्यनाथ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यागीच्या सुरक्षेसाठी तीन सशस्त्र अंगरक्षक पुरविण्यात आले होते. जेव्हा त्यागीला सुरक्षा कवच देण्यात आलं तेव्हा अरविंद कुमार उत्तर प्रदेशच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते आणि गाझियाबादचे एसएसपी वैभव कृष्ण होते. दरम्यान, गाझियाबादचे एसएसपी मुनिराज यांनी श्रीकांत त्यागीला सुरक्षा तपशील जारी करण्याबाबत सविस्तर अहवाल उत्तर प्रदेश सरकारला पाठवला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला सुरक्षा कवच देणाऱ्यांवर कठोर कारवाई होऊ शकते.

खाण माफियाशी संबंध

श्रीकांत त्यागी आणि खाण माफिया यांच्यातील संभाव्य संबंधांचा पोलीस तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सोनभद्र-मिर्झापूर परिसरात या गुंड नेत्याचा खाणकामाचा मोठा व्यवसाय असल्याची माहिती आहे.

त्यागीला पकडण्यामागचं नेमकं कारण काय?

श्रीकांत त्यागीने तो राहत असलेल्या नोएडाच्या सेक्टर-९३ बी मधील ग्रँड ओमॅक्स सोसायटीतील भांडणानंतर एका महिलेला मारहाण केली. त्यागी लावत असलेल्या काही झाडांवर सबंधीत महिलेने आक्षेप घेतल्यानं ही घटना घडली होती. यावेळी त्यागीनं संबंधित महिलेला मारहाण करत शिविगाळ करत अपमानास्पद शब्दांचा वापर केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.