Noida Twin Towers : 13 वर्षात बांधलेला ट्विन टॉवर 9 सेकंदात होणार जमीनदोस्त

ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत पाडण्याची सूचना
Noida Twin Towers : 13 वर्षात बांधलेला ट्विन टॉवर 9 सेकंदात होणार जमीनदोस्त
Updated on

आज नोएडातील अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ट्विन टॉवर पाडले जाणार आहेत. एडिफाय इंजिनीअरिंगला हे ट्विन टॉवर्स पाडण्याचे काम देण्यात आले आहे. हे ट्विन टॉवर पाडण्यासाठी 46 जणांची टीम काम करत आहे. ही टीम दररोज सुमारे 12 तास स्फोटकं लावण्याचं काम करत आहे.

सन 2012 पर्यंत अॅपेक्स आणि सायन टॉवर्स केवळ 13 मजले बांधू शकले, पण जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा बिल्डरने या प्रकल्पाला एवढी गती दिली की, दीड वर्षात आणखी 19 मजले बांधण्यात आले. 2014 मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे काम थांबले. बिल्डरची युक्ती कामी आली नाही. न्यायालय असा कोणताही निर्णय घेऊ नये म्हणून टॉवर्सची उंची वाढवण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते, मात्र उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या आणि पर्यावरणाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचवेळी दुसऱ्या सुधारित आराखड्यानुसार हे टॉवर केवळ 24 मजल्यापर्यंत बांधले असते तर कदाचित आज ते पाडण्याचा धोका नसता.

टॉवर पाडण्याची तारीख 22 मे 2022 निश्चित करण्यात आली होती, परंतु तयारी पूर्ण झाली नसल्याचे नमूद करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणांना वेळ दिला. यानंतर 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान टॉवर तोडण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, यावेळीही टॉवर पाडण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती, मात्र संबंधित यंत्रणेने प्राधिकरणाला पत्र देऊन ट्विन टॉवर कमकुवत झाल्यामुळे धोक्याची भीती व्यक्त करत 28 तारखेपर्यंत तो पाडण्याची सूचना केली होती.

2012 मध्ये, एमराल्ड प्रकल्पाच्या RWA ने प्राधिकरणावर असमाधानी झाल्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस तपासाचे आदेश देण्यात आले असून तपासात रहिवाशांचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला. 2014 मध्ये उच्च न्यायालयाने ट्विन टॉवर पाडण्याचे आदेश दिले होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सुपरटेकने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने 31 ऑगस्ट 2021 रोजी आदेश जारी केला आणि ट्विन टॉवर तीन महिन्यांत पाडण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com