पगार वाढल्याशिवाय कामावर नाही येणार, कामगार ठाम; जाळपोळ आणि तोडफोड सुरूच, ७ FIR, ३०० जण ताब्यात

Noida Protest : उत्तर प्रदेश सरकारने २१ टक्के पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही कामगार त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. अनेक औद्योगिक परिसरातील कारखान्यांबाहेर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे.
Workers refuse to return without salary hike unrest in Noida intensifies

Workers refuse to return without salary hike unrest in Noida intensifies

Esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील नोएडात पगारवाढीसह अनेक मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने २१ टक्के पगारवाढीची घोषणा केल्यानंतरही कामगार त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. किमान वेतनात वाढ करण्याची घोषणा केली असली तरी संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केल्याचे प्रकार घडले आहेत. अनेक औद्योगिक परिसरातील कारखान्यांबाहेर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. जोपर्यंत पगार वाढवणार नाहीत तोपर्यंत कामावर येणार नाहीत अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com