esakal | दिल्लीतील ध्वनिप्रदूषणाला बसणार चाप; जबर दंड वसूल केला जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

Noise Pollution

दिल्लीतील ध्वनिप्रदूषणाला बसणार चाप; जबर दंड वसूल केला जाणार

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - शांततेचा भंग करणाऱ्यांवर व ध्वनी प्रदूषण (Spund Pollution) करणाऱ्यांकडून ध्वनिप्रदूषण करणारी साधने सरळ जप्त करण्याबरोबरच संबंधितांकडून १ लाख रुपयांपर्यंतचा जबर दंड (Fine) वसूल केला जाणार आहे. राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण समितीनेही याबाबत बनवलेल्या योजनेला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) मान्यता दिली आहे. (Noise Pollution in Delhi Heavy Fines will be Levied)

भीषण उन्हाळ्यामुळे दिल्लीतील ध्वनी प्रदूषणाची पातळीही प्रचंड वाढली आहे. दिल्ली सरकारने याला आळा घालण्यासाठी शिस्तभंग करणाऱ्यांना जबर दंड आकारला जाणार आहे. त्यानुसार साउंड सिस्टीम लावून परिसरातील नागरिकांचा शांतताभंग करणाऱ्यांना १० हजार ते २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे आणि ही यंत्रेही जप्त केली जातील. १००० केव्हीच्या पुढील क्षमतेचे डीजे सेट लावणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड व डीजे यंत्रे जप्त करण्याची तरतूद यात आहे.

हेही वाचा: 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

दिल्लीत सध्या उन्हाळ्याने कहर केला आहे. अनेक ठिकाणी मोठे जनरेटर २४ तास चालविले जातात. असे करणाऱ्यांना २५ ते ५० हजारांचा दंड केला जाईल. शांतता क्षेत्रात लग्नाच्या वरातीत आतषबाजी करणाऱ्यांना ३ हजार रुपये तर रहिवासी विभागात ती करणाऱ्यांना १ हजार रुपयांचा दंड होईल. रहिवासी विभागात रात्री सभा घेणारे, वरात काढणारे, धार्मिक जागरण कार्यक्रम करून कर्कश गाणी वाजविणारे यांना १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. शांतता क्षेत्रात हेच प्रकार करणाऱ्यांकडून २० हजार रुपये दंड जागीच आकारला जाईल.

आता महागलेल्या दूधाचाही चटका

अमूल कंपनीने दोन दिवसांपूर्वीच दुधाची दरवाढ केली. त्यापाठोपाठ आता दिल्ली दुग्ध योजननेनेही उद्यापासून (ता.११) दुधाचे दर वाढविले आहेत. त्यानुसार मदर डेअरीच्या दुधात उद्यापासून (ता. ११) सरासरी २ रुपयांची दरवाढ करण्यात आली. आधीच महागाईचा मार बसलेल्या दिल्लीकरांना दुधाच्या दरवाढीचा जोरदार फटका आता बसणार आहे.

loading image