esakal | 'कोव्हॅक्सिन'चा लवकरच आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश - WHO
sakal

बोलून बातमी शोधा

Covaxin

'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : भारताची पहिली स्वदेशी कोरोनाप्रतिबंधक लस असलेल्या भारत बायोटेकच्या कॉव्हॅक्सिन या लसीची WHOच्या आपत्कालिन उपयोग यादीत (EUL) येत्या काही दिवसात समावेश होऊ शकतो. येत्या चार ते सहा आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. WHOच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्य विश्वनाथन यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. स्वामीनाथन यांनी शुक्रवारी सेंटर फॉर सायन्स अँड इनव्हायरमेंट (CSE) या संस्थेद्वारे आयोजित वेबिनारमध्ये संबोधित करताना ही माहिती दिली.

स्वामीनाथन म्हणाल्या, "कोव्हॅक्सिन या कोरोनाप्रतिबंधक लसीची निर्माता कंपनी भारत बायोटेक त्यांच्याकडील चाचण्यांचे संपूर्ण आकडेवारी आमच्या पोर्टलवर अपलोड करत आहे. या आकड्यांच्या आधारे WHO या लसीचं परिक्षण करत आहे. WHOच्या गाईडलाईन्सनुसार, EUL ची एक विशिष्ट प्रक्रिया आहे. याअंतर्गत नवीन आणि विनालायसन्स प्राप्त उत्पादनांचा वापर सार्वजनिक आरोग्याच्या आपत्कालिन परिस्थितीत केला जाऊ शकतो." स्वामीनाथन यांनी म्हटलं की, "EULची एक प्रक्रिया असते यामध्ये कोणत्याही कंपनीला तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण कराव्या लागतात. तसेच यासंबंधीची सर्व आकडेवारी WHO च्या नियामक विभागाकडे जमा करावी लागते. या आकडेवारीची तज्ज्ञांच्या टीमकडून अभ्यास केला जातो."

चार ते सहा आठवड्यात मंजुरीची शक्यता

लसींच्या ट्रायल्स संदर्भात जी संपूर्ण आकडेवारी दिली जाते ज्यामध्ये लसीची सुरक्षा आणि प्रभाव तसेच उत्पादन गुणवत्ता मानकं यांचा समावेश असतो. भारत बायोटेकनं यापूर्वी ही आकडेवारी सादर केली आहे. त्यामुळे मला आशा आहे की, येत्या चार ते सहा आठवड्यात कोव्हॅक्सिनच्या लसीला EULच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला जाईल, असं यावेळी स्वामीनाथन यांनी सांगितलं.

सध्या सहा कंपन्यांच्या लसींचा यादीत समावेश

सध्या WHO ने फायझर, एस्ट्राझेनेका, सीरम इन्स्टिट्यूट, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना आणि सिनोफार्मा या कंपन्यांच्या लसीला जागतीक मान्यतेसाठी EULमध्ये समाविष्ट केलं आहे. स्वामीनाथन यांनी सांगितलं की, आम्ही आत्तापर्यंत सहा लसींना EULसाठी मंजुरी दिली आहे. यानंतर आता कोव्हॅक्सिन लसीबाबत आशावादी आहोत.

loading image