मे महिन्यात तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता : IMD | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Summer Season

मे महिन्यात तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता : IMD

नवी दिल्ली : एकीकडे देशातील वाढत्या तापमानामुळे (Temperature) नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत असताना हवामान विभागाने (IMD) मे महिन्यात उत्तर भारतातील (North India) तापमान 50 अंशांच्या पुढे जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी उन्हाचा सध्याचा ट्रेंड पाहता वरील अंदाज वर्तवला आहे. (IMD Prediction On North India Temperature )

हेही वाचा: चीनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ला ईडीचा दणका; जप्त केले 5,551 कोटी

एप्रिलमधील वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.90 अंश सेल्सिअस आणि 37.78 अंश सेल्सिअससह गेल्या 122 वर्षांतील सर्वोच्च असल्याचे मत हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. वायव्य आणि ईशान्य भारतातील काही भागांसह आग्नेय द्वीपकल्प वगळता भारताच्या बहुतांश भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे महापात्रा म्हणाले. त्याशिवाय मे महिन्यात पश्चिम मध्य आणि वायव्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये आणि ईशान्य भारताच्या उत्तर भागात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता असून, देशातील उर्वरित भागात तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रासह उत्तरेत उष्णतेची लाट

हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भ, महाराष्ट्रात उष्णतेची लाट (Heat Wave In Maharashtra) येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर,पुढील तीन दिवस पंजाब, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि तेलंगणाच्या उत्तर भागाला उष्णतेच्या लाटेला सामोरे जावे लागू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हेही वाचा: "भाजपाला हरवायचं असेल तर..."; प्रशांत किशोर यांचा राजकीय पक्षांना सल्ला

दिल्लीत उष्णतेचा कहर! एप्रिल ठरला 72 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना

दिल्लीसह भारताच्या उत्तर आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली असून, राजधानी दिल्लीत (Delhi) 72 वर्षातील दुसरा सर्वात उष्ण महिना एप्रिल महिन्याची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, एप्रिल महिना दिल्लीत 72 वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे. (Heat Wave In Delhi) राजधानी दिल्लीत एप्रिल महिन्यातील उष्णतेने 72 वर्षांचा विक्रम मोडला असून, 1950 नंतर दिल्लीत एप्रिल महिन्यात एवढी उष्णता जाणवण्याची ही दुसरी वेळ असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे. यापूर्वी एप्रिल 2010 मध्ये उष्णतेही तीव्र लाट आली होती.

Web Title: North India Temperature Cross Fifty Degree In May Imd

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiasummerIMDTemperature
go to top