

balkrishna jarkiholi
Esakal
कर्नाटकच्या राजकारणात उत्तर कर्नाटकला स्वतंत्र राज्य करण्याची मागणी पुन्हा चर्चेत आली आहे. येत्या ५ ते १० वर्षांत उत्तर कर्नाटक वेगळं राज्य होऊ शकतं असं मोठं विधान भाजप आमदार बालकृष्ण जारकीहोळी यांनी केलं आहे. उत्तर कर्नाटकचा अपेक्षित विकास झालेला नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्याच्या मागणीवर विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कर्नाटक विधानसभेचं हिवाळी अधिवेशन २ डिसेंबरपासून बेळगावमध्ये सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जारकीहोळी यांनी हे विधान केलं. उत्तर कर्नाटकच्या विकासाचे प्रश्न या अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे.