पूर्वोत्तर राज्यांना ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के |Northeast Earthquake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वोत्तर राज्यांना ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

भारत बांगलादेश सीमेवर मिझोराममध्ये भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती.

पूर्वोत्तर राज्यांना ६.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

भारताच्या पूर्वोत्तर राज्यांना आज भूकंपाचे धक्के बसले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास भारत बांगलादेश सीमेवर मिझोराममध्ये भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल इतकी होती.

मिझोरामला भूकंपाचा मोठा धक्का बसला तर त्रिपूरा, मणिपूर आणि आसामसह पश्चिम बंगालमध्येही याचे धक्के जाणवले. या भूकंपामुळे जिवित किंवा वित्त हानी झाल्याचं अद्याप समोर आलेलं नाही.

भूकंपाचे केंद्र भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये होता. मिझोराममधील थेन्झॉलपासून ७३ किमी अंतरावर असणाऱ्या चटगावमध्ये भूकंप झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे पाच वाजून १५ मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीपासून १२ किमी खोल होते.

टॅग्स :Indiabangladesh