Heavy Rainfall Northeast : देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाने कहर केलाय. सिक्कीम, आसाम, मेघालय, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनात किमान ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.